महानगरपालिकेचे ना निवडणुक तिरंगी होणार हे चित्र आता जवळपास स्पष्ट होत आहे. भाजपने स्वबळाचा नारा दिला तर शिवसेनेचे अजून आघाडीसोबत तळ्यात-मळ्यात आहे. तरीही या निवडणुकीत शिवसेना-भाजप, एमआयएम अशी तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह आमदार अतुल सावे, आमदार नारायण कुचे, आमदार हरिभाऊ बागडे हे तीन आमदार तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या ताफ्यात रोहयोमंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट यांचा समावेेेश आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची सूत्रे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे असणार आहेत. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे शिवसेनेचा धुरा राहील. या दोन्ही नेत्यांमधील पारंपारिक शत्रुत्व लक्षात घेता ही निवडणूक रंगतदार होईल, यात शंका नाही. गेल्या दोन निवडणुकांपासून रावसाहेब दानवे यांनी महानगरपालिकेत चांगलाच उलटफेर केला. आपली माणसे महत्त्वाच्या पदावर नेमून महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला त्यांनी जेरिस आणले. जिल्हा परिषदेत भाजप नंबर एकचा पक्ष बनला. आता महानगरपालिकेतही त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी दानवे यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्यामुळेच पराभव झाल्याचा थेट आरोप करणारे चंद्रकांत खैरे आता या निवडणुकीत भाजपला उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. सध्या शिवसेनेचा शत्रू नंबर एक म्हणजे भाजप आहे. या दोन्ही पक्षातील कट काटशहाचे राजकारण चांगलेच रंगणार यात शंका नाही. खैरेंसोबत 2 मंत्री 3 आमदार असा जबरदस्त ताफा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील लढाई आता कशी होते याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे करिष्मा घडला. राज्यात पहिल्यांदाच एमआयएमचा खासदार निवडून आला. विधानसभा निवडणुकीत वंचित सोबत युती नसल्याचा फटका एमआयएमला बसला होता. या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचितला सोबत घेण्याचे ठरविले आहे. एमआयएम आणि वंचित एकत्र लढल्यास चांगला परिणाम दिसून येईल. या समीकरणामुळे महानगरपालिकेची निवडणूक तिरंगी सामना होईल यात शंका नाही. डॉक्टर गफार कादरी यांचे प्रकाश आंबेडकरांची असलेले संबंध आघाडीसाठी कामी येतील का ? हाच खरा प्रश्न आहे. खासदार इम्तियाज जलील, डॉक्टर गफार कादरी वंचित चे अमित भुईगळ या त्रिकुटाने वर ही जबाबदारी असेल. बंडखोरीने त्रस्त एमआयएम पक्षात आता एकजिनसीपणा येतो का ? हेही पाहावे लागेल.